‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’तील सुधारणा
‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’ २०१२ मध्ये पिण्याचे आणि स्वच्छतेचे पाणी सोडल्यास बाकी सर्व पाण्याला आर्थिक वस्तू समजले जावे असे सुचवले गेले. नंतरच्या आवृत्त्यां ध्ये अन्नसुरक्षा आणि शेतीसाठीचे पाणी ही प्राथमिक गरज समजली जावी याची खातरजमा करण्यात आली. १९९५ मध्ये घडलेली एक घटना आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात ताजी आहे. मी एका मित्रासोबत कोई तूर च्या …